मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)दि.3 आज जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मुक्ताईनगर स्थित निवासस्थानी जाऊन युवा नेत्या,गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.सौ. केतकीताई पाटील यांनी अभिष्टचिंतन केले.तसेच,नुकतेच महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी एड.सौ.रोहिणीताई खडसे यांची निवड झाली. याबद्दल,त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी सौ.मंदाताई खडसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित दादा पवार, एड. रवींद्र भैय्या पाटील, आमदार भुसेकर साहेब आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
