भुसावळ(प्रतिनिधी)दि.10कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न* भुसावळ येथे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रविवारी कोळी समाज विकास मंडळ भुसावळ तर्फे कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केला होता . गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावी , बारावी, तसेच बी ए , बी एस सी, बी कॉम , बी एम एस एम,एम बी बी एस आणि पीएचडी धारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 132 विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मंडळाचे वतीने स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, आणि महर्षी वाल्मिक ऋषी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. कैलास लोटू सोनवणे हे होते .प्रमुख पाहुणे म्हणून श्री आर आर पवार साहेब (सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक ) , श्री बी.टी बाविस्कर साहेब (माजी मुख्याधिकारी ), श्री भिमराज कोळी माजी नगरसेवक भुसावळ, श्री सतीश सपकाळे सामाजिक कार्यकर्ते भुसावळ , सौ.सुरेखाताई साळुंखे माजी जि प सदस्या जळगाव, श्री दत्तात्रय सपकाळे हे प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी श्री बी.टी. बावीस्कर व आर आर पवार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले . श्री आर आर पवार यांनी मनोगतामध्ये सांगितले की विद्यार्थ्यांनी UPSC, MPSC या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यश संपादन करावे. "तुच आहेस तुझ्या भाग्याचा शिल्पकार". जगातील महान नेते हे सामान्य परिस्थितीतून वर आलेले आहेत , विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर सकारात्मक पद्धतीने करावा. माजी मुख्याधिकारी बी टी बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाद्वारे यश मिळवून अधिकारी पदापर्यंत जावे व समाजाचे आई-वडिलांचे नाव उज्वल करावे, त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले , याप्रसंगी काही गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सत्कार झाल्याबद्दल मंडळाबद्दल आभार व्यक्त केले. याप्रसंगी सत्कारार्थी विद्यार्थी श्री.अजय विष्णु तायडे(बबलू कोळी )या विद्यार्थ्याने खेळ कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सोनवणे , उपाध्यक्ष श्री नितीन सोनवणे , सचिव वसंत सपकाळे, श्री शांताराम कोळी , श्री रविंद्र बाविस्कर , प्रदीप सपकाळे, महारू कोळी, संदीप कोळी,सौ संजीवनी भोलाणकर , सौ वंदना सपकाळे , श्री प्रकाश सपकाळे ,भागवत सपकाळे शांताराम कोळी ,धर्मराज कोळी, दीपक सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री आर डी सोनवणे सर यांनी केले.
