सभेच्या नियोजन व प्रचारा साठी वंचित बहुजन महिला आघाडी पुर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न.
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांची जळगाव येथे दि.18 डिसेंबर 2023 रोजी होणारी सभेला जाण्याचे नियोजन , व प्रचार कशा प्रकारे करायचे त्याचे आयोजन करण्यात आले.
सदर बैठक जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, यांच्या अध्यक्षतेखाली व वंचितचे विनोदभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या वेळी जि. संघटक वंदनाताई आराख , जि.उपाध्यक्षा मिराताई वानखेडे, युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, जिल्हा कार्यकर्ता दिनेशभाऊ इखारे, कामगार जिल्हाध्यक्ष बालाजी भाऊ पठाडे, भुसावळ शहरध्यक्ष गणेशभाऊ जाधव, गणेश भाऊ इंगळे आदी यावल, रावेर ,भुसावळ ,बोदवळ, मुक्ताईनगर कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
