Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रेशन कार्डधारकांना कार्ड मिळण्यासाठी मोजावे लागतात जास्त पैसे

 *रेशनकार्ड धारकांना कार्ड मिळवण्यासाठी मोजावे लागतात जास्त पैसे .....पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार* 


ऐनपुर प्रतिनिधी:- 


रेशनकार्ड धारकांना कार्ड मिळवण्यासाठी मोजावे लागतात जास्त पैसे 

सविस्तर वृत्त असे की रावेर येथील तहसिल कार्यालयात  पुरवठा विभागात शासकीय कर्मचारी सोडून बाहेरील व्यक्ती या पुरवठा ऑफिस मध्ये बसून कामकाज करतांना दिसत असतात शासकीय कर्मचारी यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करतांना या ऑफिस मध्ये कार्डातील नाव कमी करणे वाढवणे किंवा दुय्यम कार्ड काढण्यासाठी महिला पुरुष येत असतात याठिकाणी कोणत्याही पदावर नसताना या लोकांकडून अव्वाचे सव्वा पैसे ची मागणी करुन पैसे उकळले जातात पन्नास रुपयात होणारे कामासाठी पाचशे रुपये नागरीकांना मोजावे लागत आहे अधिकारी यांच्या सोबत बोलल्यावर अधिकारी यांचे सुध्दा यांच्या सोबत त्यांचे साटेलोटे असते त्यामुळे नागरिकांना पुरवठा विभागात हेलपाटे मारावे लागत आहे यावर काही आळा बसेल का? असा नाराजीचा सूर पुरवठा विभागात येणाऱ्या नागरिकांचा निघत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.