Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाला सुरुवात

                                   


        जळगाव (प्रतिनिधी )   *सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाला सुरुवात*

  जळगाव - सद्गुरु एज्युकेशन सोसायटी शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव संलग्नित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा "या उपक्रमाचे आयोजन 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या दरम्यान करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक 31- 12- 2025 व दिनांक 1-1-2025 या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता वानखेडे मॅडम होत्या. त्यांनी शिक्षक विद्यार्थ्यांना सध्या स्थिती मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचनाची सवय कशी लोप चालली आहे याबद्दल प्रकाश टाकला .त्यानंतर ग्रंथालयात वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले .यात विविध शैक्षणिक पुस्तके, कथा ,कादंबऱ्या, नियतकालिके यांचा समावेश होता. विद्यार्थी शिक्षकांना या पुस्तकांबद्दल माहिती मिळाली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रतिभा पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन सहा प्राध्यासुवर्णा अहिरे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नारायण खडके तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील डॉ.अनिता वानखेडे ,डॉ

 प्रतिभा पाटीलडॉ

अनिता जावे ,डॉ जयश्री पाटील, सहा प्राध्या सुवर्ण अहिरे, सहा प्राध्या निधी शर्मा, जयश्री शिंगाडे तसेच ग्रंथपाल पंकज वाघ, श्री अरविंद पवार ,श्री चंद्रकांत सपकाळे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.