(प्रतिनिधी रावेर )दि. 2 रावेर येथील महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती व धम्मचक्र परिवर्तन दिवस असा संयुक्त कार्यक्रम संपन्न. रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात धम्मचक्र परिवर्तन दिवस व महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम अजबराव पाटील माजी नगराध्यक्ष दारा मो जफर मो. गोकुळ तायडे सर राजू घेटे पी.एस.आय.पाटील साहेब या मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमानां माल्यार्पण करून तसेच राजेंद अटकाळे प्रकाश महाले त्र्यंबक वाघ संजय मसाने संतोष गाडे सर यांच्या हस्ते दिप धुप पुजन करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जगदीश घेटे यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमास संस्थेचे संचालक दशरथ घेटे अशोक घेटे तसेच मनोहर गाडे सागर नागरे अनिल घेटे अनिल तायडे सम्यक इंगळे शेख सईद विजय खैरे सर सी आर पाटील सर कुंडलिक कोंगे इकबाल अहमद सर शेख अरुण सत्तार भाई प्रवीण घेटे आशुतोष घेटे व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी निलेश तायडे यांनी आभार मानले
