15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत आचेगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ध्वजारोहण ग्रामपंचायत आचेगाव सरपंच सो मनीषा ताई झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले जि.प शाळा आचेगांव येथे स्कूल चेअरमन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वात प्रथम गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकासह गावातील सर्वच सन्माननीय सरपंच उपसरपंच सदस्य शालेय समिती अध्यक्ष शिक्षक वृंद ग्रामसेवक अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका गावातील नागरिक यांची सर्वांची उपस्थिती होती विद्यार्थी याना खाऊ देऊन कार्यकमांची सांगता करण्यात आली .
यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य विभाग शिक्षण अधिकारी प्रमोद पाटील आचेगांव ,उपसरपंच दीपक पाटील,स्कूल चेअरमन सो . कल्पनाताई चौधरी ,सदस्य श्री नरेंद्र पाटील ,भाजपा तालुका ग्रामीण सरचिटणीस, श्री आकाश झांबरे ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री आशिष चौधरी सदस्या सौ माधुरीताई फेगडे , सदस्या सौ प्रतिभाताई पाटील , सदस्य अक्षय बेंडाळे व ग्रामसेवक तायडे तसेच माजी , सरपच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते
