Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऐश्वर्या रॉय सारखे मासे खा, म्हणजे चिकने दिसाल, कोणीही पटवून घेईल, मंत्री विजयकुमार गावित यांचा सल्ला

 

धुळे दि.22 ( प्रतिनिधी)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस-पवार महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहेत. तसे मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असं मंत्री विजयकुमार गावित म्हणाले. विजयकुमार गावित हे नंदुरबार मधील भाजप नेते असून सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत.

विजयकुमार गावित काय म्हणाले?


मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की माणूस.. माणूस म्हणजे बाईमाणूस... चिकने दिसायला लागतात, डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. कोणी ऐश्वर्या राय बघितली का, काय रे सांगितलं की नाही ऐश्वर्या राय, ही समुद्राच्या किनारी राहणारी, बँगलोरची, समुद्राच्या किनारी... ती दररोज मासे खायची, बघितले की नाही तिचे डोळे, तसे तुमचे पण होणार, आणि हा एक फायदा आहे, आपली जी स्कीन  चांगली दिसते, त्यात ऑईल असते, तेल असते, त्यामुळे डोळ्यावर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची स्कीन चांगली दिसते, असं विजयकुमार गावित म्हणाले.

धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय कुमार गावित यांनी हे वक्तव्य केले. त्यावेळी मंचावर त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या.

कोण आहेत विजयकुमार गावित ?


डॉ. विजयकुमार गावित यांनी २०१९ च्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. ते नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आधी २००९ मध्ये आघाडी सरकार, मग २०१४ मध्ये फडणवीस कॅबिनेट मंत्रिपद भषवलं आहे ,आणि आता २०२२ मध्ये शिंदे सरकारमध्ये आदिवासी विकास  कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहे .

 डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांची कन्या हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.