Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रावेर येथे वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

 

रावेर( प्रतिनिधी )दि.21. रावेर येथे वंचित बहुजन आघाडी आघाडीचा मोर्चा रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 21 .8 .2013 सोमवार रोजी दुपारी 12. वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये पक्षाच्यावतीने महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व आमच्या मागण्या खालील प्रमाणे 1.) केंद्र सरकार असो व राज्य सरकार असो. एस सी, एस टी,  ओबीसी मुलांना परीक्षा शुल्क कमी करण्यात  यावी .2)सन 2019 रावेर शहरातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा शेवटचा हप्ता तात्काळ देण्यात यावा.3 )दिनांक 8,6,2023 रोजी रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह व पावसामुळे घरांचे व शेती केळी पिकाचे जास्त प्रमाणात   नुकसान झालेले असून नुकसान ग्रस्तांना त्वरित मदत मिळण्यात यावी .4 )संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ ,अर्थ सहाय्य ,श्रावण बाळ या योजनेची रक्कम दर महिन्याला देण्यात यावी जेणेकरून वृद्ध व्यक्तींची धावपळ होणार नाही.5) रावेर येथील गट नंबर 494 कब्रस्तान छपरी बंद फकीर समाज यांच्या ताब्यात  देण्यात यावी .6. )गायरान जमिनी संदर्भात २० जुलै मुंबई येथे महामोर्चा मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर विधान भवन येथे चर्चा होऊन गायरान जमिनीचा प्रश्न मंजूर झालेली मागणी असून रावेर तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील सर्कल यांनी लोकांना त्रास देऊ नये.

अशाप्रकारे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने रावेर तहसील कार्यालय येथे मोर्चा नेऊन निवासी नायब तहसीलदार श्री आर .डी. पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात सहभागी मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे ,युवक प्रदेशचे सदस्य समीभा पाटील जिल्हा महासचिव दिनेश ईखारे जिल्हाध्यक्ष कामगार बालाजी पठाडे ,महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजर, जिल्हा उपाध्यक्ष शेख रफिक बॅग, तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, तालुका उपाध्यक्ष, सुरेश अटकाळे तालुका संघटक कंदर सिंग बारेला, अर्जुन वाघ , तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, दौलत अडांगळे महिला गाडी तालुकाध्यक्ष सौ गायत्री कोचुरे , देवदत्त मकासारे, कैलास तायडे, शिवा बेल्लार, प्रकाश तायडे तसेच रावेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडो महिला पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.