
आज दि 26/8/2023 रोजी भुसावळ येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली, या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली ते खलील प्रमाणे
1) आपल्या गावातील, वार्डातील,तालुक्यातील लोकांच्या समस्या जाणून घेणे
2) तालुक्यातील सर्कल गट व गण कार्यकारिणी तयार करणे
3) सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेस मिळवून देण्यास मदत करणे
4) तालुक्यातील अतिक्रमण धारकांना त्यांची जमीन नियमित करून त्यांना घरकुल मिळवून देण्या करिता शासन दरबारी पाठपुरावा करणे
5) गट प्रमुखांची नियुक्ती करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणे
6) पक्षाचे ध्येयधोरणे गाव वाड्या पर्यंत पोहोचविणे
7) तालुका पातळीवर कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करून वॉर्डापासून ते तालुका पर्यन्त सतत कार्यरत ठेवणे व तालुक्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करणे
वरील विषयावर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी मार्गदर्शन केले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षाचे क्रियाशील सभासद होणे बंधनकारक आहे व तालुका कार्यकारिणीने दरमहा मिटिंग घेऊन केलेल्या कामांचा आढावा देणे असे पक्षवाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी बैठकिचे अध्यक्ष भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बाविस्कर होते यावेळी नवनियुक्त भुसावळ तालुका कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व मान्यवरांनी अभिनंदन व सत्कार केला या प्रसंगी उपस्थित जिल्हा महासचिव दिनेश इखारे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,नवनियुक्त भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर,तालुका महासचिव गणेश इंगळे, तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव, उपाध्यक्ष गौतम लोखंडे, तालुका संघटक कुणाल सुरडकर, उपाध्यक्ष संदीप सुरवाडे, तालुका सचिव ऍड शकील अहमद खान, तालुका सल्लागार ऍड प्रमोद तायडे, सचिव मनोज ठोकड , सचिन वानखेडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,भुसावळ शहर महासचिव माजी सैनिक देवदत्त मकासरे ( मेजर ), संजय निरंवडे, भीमराव उमाडे, बाळू कोळी, श्याम निकम व आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन निलेश जाधव यांनी केले व आभार गौतम लोखंडे यांनी मानले.