दि.27 (प्रतिनिधी)आज रावेर लोकसभेतील केऱ्हाळे ता.रावेर येथील ग्रामपंचायत कार्यालय आयोजित पाणीपुरवठा योजनाभूमिपूजन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून युवा नेत्या डॉ.सौ.केतकीताई पाटील यांनी उपस्थिती लावली. या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री संजय पवार,रावेर तहसीलदार
श्री.कापसे सर, गावच्या सरपंच सौ. दिपाली ताई लहासे, उपसरपंच सौ. सविता विजय पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष
श्री.अमोलभाऊ जावळे, प्रहार संघटनेचे नेते मा.अनिल चौधरी, मा. आ.श्री शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिनिधी धनंजय चौधरी, पंचायत समिती यावलचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पाणीपुरवठा योजना भूमिपूजन कार्यक्रमास अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
