Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बोदवड येथील अमर हॉटेल च्या अतिक्रमामुळे गेला एका निष्पाप व्यक्तीचा जीव

                                         


दि.1(प्रतिनिधी बोदवड)  बोदवड येथील अमर हॉटेल च्या अतिक्रमणामुळे गेला एका निष्पाप व्यक्तीचा जीव..



बोदवड येथील अमर हॉटेल मेन रस्त्यावर चौफुलीवर असल्यामुळे अमर हॉटेलमध्ये जाणाऱ्या व्यक्तींच्या गाड्या रस्त्यावर असतात. त्यांच्यामुळे पूर्ण रस्ता झाकला जातो. व तेथून कसेबसे वाहन काढून तारेवरची कसत वाहनधारकांना करावी लागते. अतिक्रमण असून तिथे गाडयांचा ताफा मोठ्या प्रमाणात उभा राहत असल्यामुळे आज एका निष्पाप जीवाचा ट्रक खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

      याबाबत सविस्तर असे की, बोदवड येथील प्रभू ऍग्रो मध्ये काम करीत असलेले सुरेश गंगाराम पाटील यांचे वडील गंगाराम पाटील (वय 78) यांचे आज सकाळी दहा वाजता एका ट्रक खाली येऊन त्यांचा जीव गेला आहे. ट्रक नाडगाव कडून मलकापूरला जात होते. त्या चौफुलीवर अनेक गाड्या उभा होत्या. त्याच्यामुळे ट्रकला वळण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. अशातच तेथून गंगाराम पाटील पायी जात होते. त्या ट्राफिक मध्ये पाय घसरून ते वृद्ध ट्रकच्या खाली पडले. आणि त्यांच्या डोक्यावरून मागचे ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यांचा मेंदू बाहेर आला. परिणामी त्यांचा जागच्या जागीच मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी त्यांना सरकारी दवाखान्यात नेले आहे.परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.अशा घटना अनेक वेळेस या ठिकाणी होतात. त्यामुळे अमर हॉटेलचे अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावं याविषयी अनेक वेळा जनसेवक विनोद पाडर यांनी व समाजसेवकांनी बऱ्याच वेळेस लेखी तोंडी नगरपंचायत कडे अर्ज केलेले आहेत.अमर हॉटेलची जागा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दिलेली होती. त्यामुळे तेथे स्मारक व्हावे यासाठी अनेकदा आंदोलन व,मोर्चे,उपोषण तक्रारी करण्यात आल्या.परंतु बोदवड नगरपंचायत च्या हलगर्जीपणामुळे व पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आज परत एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आहे.त्यामुळे या गोष्टीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ती जागा खाली करावी. अतिक्रमण मोकळे करावे व त्या ठिकाणी नेहमी एक ट्राफिक हवालदार पोलिसांनी ठेवावा. जेणेकरून अतिक्रमण व ट्राफिक होणार नाही अशी मागणी बोदवडकरांनी नेहमी केलेली आहे व आजही करीत आहे.त्यामुळे निगरगठ्ठ झालेले अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित अतिक्रमण काढावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या  स्मारक साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनतेकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.