*शिक्षणाचे खाजगीकरण होऊ देणार नाही - मुकुंद सपकाळे*
जळगाव -दि.5 महाराष्ट्र राज्यातर्फे राज्यातील 62000 शासकीय शाळांचे खाजगीकरण होऊ घातले आहे . अशा प्रकारचे धोरण हे इथल्या सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना घातक असून त्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा घाट घातला जात असल्याने हे खाजगीकरण थांबवण्याकरता सर्व स्तरातून प्रयत्न करून आम्ही सर्वशक्तिनिशी हे धोरण हाणून पाडू , याकरिता जिल्हाभरच नाही तर महाराष्ट्रात देखील आंदोलन केले जाईल असे स्पष्ट प्रतिपादन मुकुंद सपकाळे यांनी केले.
शिक्षण बचाव जन आंदोलन समितीतर्फे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले असता संयोजक म्हणून सपकाळे बोलत होते.
मुकुंद सपकाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की , "सरकारने शिक्षणावर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करायला हवा मात्र सरकार तसे न करता भांडवलदारांच्या घशात शाळा घालत आहे. हे राज्याच्या व एकूणच समाजाच्या विकासाच्या दृष्टीने घातक आहे.
या धरणे आंदोलनात विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक , प्राध्यापक , संस्थाचालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ईकरा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. करीम सालार, साहित्यिक जयसिंग वाघ , प्राध्यापक एस एस राणे, शिवराम पाटील, राजकिशोर गुप्ता , प्राध्यापक व्हि.डि. पाटील , प्राध्यापक दिलीप भारंबे , ऍड सलीम खान , ऍड. राजेश गोयर , आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडून शासनाच्या निर्णयाचा विरोध करून अशा प्रकारचे धोरण आम्ही प्रत्यक्षात येऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला . या धरणे आंदोलनात अमोल कोल्हे, सुमित्र अहिरे, रमेश सोनवणे, पुरुषोत्तम चौधरी , संजू जमादार, सुरेश तायडे, गोपाळ भालेराव , एस बी चौधरी , डॉ शांताराम बडगुजर , अखिल खान , जगदीश सपकाळे , जगदीश पाटील , गुलाबसिंग पाटील, साहेबराव वानखेडे , प्राध्यापक सत्यजित साळवे, विनोद रंधे , सय्यद जहिर अली , निलू इंगळे , श्रीकांत बाविस्कर , अविनाश तायडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कोल्हे यांनी व सूत्रसंचालन प्राध्यापक प्रितिलाल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन फईम पटेल यांनी केले . यानंतर आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा करून निवेदनकर्त्यांनी आपली बाजू मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव शिरसाठ , महिंद्र केदार ,चंदन बिऱ्हाडे , राजू सवरणे , उमेश गाढे आदींनी परिश्रम घेतले.
