*वंचित बहुजन आघाडी रावेर येथे 26 नोव्हेंबर मुंबई येथे जाहीर सभा संदर्भात महत्वपूर्ण बैठक*
रावेर प्रतिनिधी दि.20. रावेर येथे उद्या दिनांक 21 ,11 ,2023 मंगळवार रोजी सकाळी 11. वाजता रावेर येथील नवीन विश्रामगृह रेस्ट हाऊस येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा पूर्वचे निरीक्षक व महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आद. शरदरावजी वसतकर साहेब प्रमुख मार्गदर्शक लाभले असून येणाऱ्या 26. नोव्हेंबर रोजी मुंबई येथील जाहीर सभेसाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुल संविधान सभा यशस्वी करायचे आहे. या संदर्भात प्रमुख मार्गदर्शन करणार असून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा , तालुका पदाधिकाऱ्यांनी व आजी ,माझी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या बैठकीला जास्तीत, जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचे आहे असे आव्हान रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी केले आहे .