Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरपंचाची गुंडागिरी ग्रामस्थांची गांधीगिरी


                                 


*सरपंचाची गुंडगिरी, ग्रामस्थांची गांधीगिरी , ग्रामसभेत हमरी-तुमरी, दखल घेणार जिल्हाधिकारी*

जळगाव - पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे  ३० नोव्हेंबर २०२३ रोजी नुकतीच गरमागरम ग्रामसभा पार पडली. ग्रामसभा शांततेमध्ये व सभ्यपणे संपन्न करण्याची कायदेशीर जबाबदारी ज्यांच्यावर असते , त्या ग्रामपचांयत पदाधिकारी यांनीच कायदे आणि नियम धाब्यावर बसवत ग्रामसभेत सावळा गोंधळ घालून ग्रामसभेत गुंडगिरीचे प्रदर्शन करून गौणखनिज चोरीमध्ये

झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.

       याविषयी सविस्तर वृत्त असे की , तारखेडा (खु!) या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून गौणखनिज मुरूम चोरीचे प्रकरण गाजत आहे. या वादाची पार्श्वभूमी अशी की , बी.एन. इन्फ्रा कंपनीने गावाच्या कार्यक्षेत्रामधून गेल्या आठ महिन्यापासून रेल्वेच्या कामाच्या नावाखाली दिलेली परवानगी व भरलेली रॉयल्टी यांच्या प्रमाणापेक्षा अधिक व संदिग्धपद्धतीने मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक करून शासनाचा महसूल बडविला असल्याचा तारखेडा ग्रामस्थांचा आरेाप आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ग्रामस्थांनी गौणखनिजाची अवैध वाहतूक करणारे चार डम्पर रंगेहाथ पकडून महसूल विभागाच्या हवाली केले होते. यावर महसूल विभागाने रॉयल्टी वसूली दंडात्मक कारवाई केलेली होती. या गौणखनिज चोरीमध्ये ग्रामपंचायत स्तरातील काही मंडळीचे छूपे हितसंबंध असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला होता. ३० नोव्हेंंबरच्या ग्रामसभेत हा मुद्‌दा पंकज पाटील आणि अन्य ग्रामस्थ यांनी उपस्थित केला. तेव्हा सरंपच संगिता पाटील, सरपंच पती राजेंद्र पाटील त्यांचा पूतण्या सचिन पाटील यांनी पंकज पाटील यांच्या अंगावर धावत येत जीवे मारण्याची धमकी दिली. उपस्थित ग्रामस्थांनी पंकज पाटील यांचा बचाव केला. तसेच उपसरपंच सुनिल पाटील यांनी ग्रामसभेत कोणी प्रश्न उपस्थित केला तर पाहून घेऊ अशी धमकी दिली. यासंबधीचे व्हिडीओ रेकाडिंग पुरावे उपलब्ध आहेत. यासंबंधी पंकज पाटिल यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन गौणखनिज चोरी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांची गैरवर्तन याविषयी कडक कारवाई व्हावी म्हणून सविस्तर निवेदन दिले असून योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरण गंभीरपणे घेत असल्याचे व ग्रामसभेत झालेल्या दमदाटी बद्दल पोलीसांत कारवाई करण्याचे सूचविले आहे.

          जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्ट मंडळात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, पाचोरा तालुका अध्यक्ष तथा या प्रकरणात पिडीत पंकज पाटील, शैलेंद्र सपकाळे , नरेंद्र सपकाळे , चंद्रकांत श्रावणे, गुणवंत सोनवणे, जगदिश सोनवणे, अरविंद जाधव , संजय जटाळे , कृष्णा पाटिल , चेतन जाधव इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.