प्रतिनिधी रावेर 12 रावेर तालुक्यातील अजंदे येथे घाणीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष. रावेर तालुक्यातील अजंदे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे गावातील संपूर्ण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांतून बोलले जाते अजंदे गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्व दूध गटारी साचले आहे गावातील कचरा उचलल्या जात नाही त्यामुळे तो गटारीत अडकून गटारी जाम होतात असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे सासलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे सोबतच दुर्गंधीमुळे नागरिक बेजार झाले आहे त्यामध्ये जिल्ह्यामध्ये डेंगू आणि मलेरिया चा प्रादुर्भाव होत असल्याने या घाणीचे साम्राज्य पसरल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केल्या. मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावातील समस्यांची निवारण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. नागरिकांचा आरोग्यसेवा गावात उपलब्धता व्हावी म्हणून गावात उपकेंद्र इमारत उभारण्यात आले असून ते फक्त शोपीस पार्किंग हाऊस का? असा खडा सवाल जनतेच्या मनात येत आहे तिथं आरोग्य विभाग कडून कर्मचारी नियुक्त करण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे हे उपकेंद्र लवकरात लवकर चालू होईल का याची सर्व गावकरी आतुरतेने वाट पाहत आहे.
