Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रावेर परिसरात अवैद्य वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल वन विभागाचे हेतू पुरस्कर दुर्लक्l

 रावेर परिसरात अवैध वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल, वनविभागाचे हेतु पुरस्कर दुर्लक्ष....



रावेर दि. 26 ( प्रतिनिधी रावेर ) रावेर परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून हिरव्यागार झाडांची वनविभाची कोणती ही परवानगी न घेता कत्तल होत आहे. याकडे वनविभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले की काय असा प्रश्न निसर्ग प्रेमींच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.


रावेर व परिसरात हिरव्यागार लिंम, बाभुळ, आंबा, आदी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. यामध्ये वनविभागाचा छुपा पाठींबा तर नाही ना की मोठे अर्थकारण आहे. चोरवड चेक पोस्टवर वनविभागाचे चेक पॉईट असतांना देखील दररोज 10 ते 15 ट्रक मध्य प्रदेशात जात आहे हे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसत नाही का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारीत आहे.

रावेर तालुक्यात अवैध वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे .शासनाने लाकूड तोड बंद व्हावी यासाठी विविध योजना शासन निर्णय सक्तीचे केले असता. कुठलेही परवानगी न घेता कुठल्या ही अधिकार्‍याचा धाक न बाळगता. रात्री  अपरात्री छुफ्या पद्धतीने अवैधरित्या जंगल तोड या ठिकाणी चालू रात्री जंगलात जाऊन पहाटे पर्यंत सर्व गाड्या लोड करून पाडला बुरहानपुर च्या दिशेने रवाना होतात याकडे शासनाने लक्ष देऊन अवैधरित्या जंगलतोड करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमी करीत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.