प्रतिनिधी रावेर दि.23. अवैद्य कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या गोवंश जातीच्या तीन गोऱ्यांची मालवाहू चार चाकी गाडी (MH. 05. BH. 6493) थांबवली असता. त्यात काड्या रंगाचे तीन गोहृरे आढळून आले. चालकास विचारले असता कुणासाठी घेऊन जात आहे. तर त्यांनी त्यांचे स्वतःचे नाव मुज्जा व मालकाचे नाव शाहरुख (वरणगाव ) असे सांगितले गाडी पोलीस स्टेशनला घे असे म्हणतात चालक गाडी स्टार्ट करून वरणगावच्या दिशेने सुसाट निघाला. दररोज रावेर ते वरणगाव कडे सकाळी चारच्या सुमारास अवैद्य गुरांची वाहतूक होत असते. या अवैद्य कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांच्या गाड्या वर आळा बसावा. व सदर गाड्यांवर कारवाई व्हावी असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.

