जी प्राथमिक शाळा गोळेगाव तालुका बोदवड येथे सन 2024-25 इयत्ता चौथी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिनांक 16 4 2018 रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छायाताई सुरवाडे व ग्रामपंचायत सरपंच सौ शारदाताई पाटील उपस्थित होत्या . तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नंदू सुरवाडे, गौरव देशमुख ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिल बावस्कर यांनी केले. शाळेच्या प्रगती विषयी त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिला. शिक्षणाने मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो असं संदेश दिला. विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भेटवस्तू दिला. तसेच या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त करून मुख्याध्यापकांना भेटवस्तू देऊन त्यांच्या सन्मान केला. तसेच शुभांगी भिमराव दशवत मॅडम यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी मोठा थाटात साजरा केला. उपस्थित सर्व आजी-माजी विद्यार्थी व पाहुण्यांसाठी मुख्याध्यापक्यांनी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सदस्य, अध्यक्ष ,सरपंच ,पालक, आजी-माजी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.
