Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रावेर मध्ये वाळू चोरट्यांचा धुमाकूळ दिवसाढवळ्या अवैद्य वाळूचे उत्खनन

                             


दि. 30 (प्रतिनिधी रावेर )*महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अटवाडा भोकरी येथून रेती तस्करी*

रावेर तहसीलदार कार्यालयापासून काही अंतरावर आटवाडा येथील रेती माफिया मना कोळी यांचं रेती तस्करीच साम्राज्य प्रस्थापीत असून दिवसा ढवळ्या भोकरी नदी पात्रातील वाळू रेती चा अवैध उपसा करून तसेच ट्रॅक्टर वर अल्पवयीन मूलांचा ड्राइव्हर म्हणून वापर करून वाळू जगतात घुमाकूळ घातला आहे.

अजनाड आटवाडा दोधे खिरवड आणी भोकरी इत्यादी नदी पात्रातील रेतीचे बेकायदेशीर उत्खनन करून अवैध रित्या रावेर शहरासह परिसरात रावेर महसूल अधिकारी, मंडळाधिकारी आणी संबंधित तलाठी यांचेशी आर्थिक हित संबंध राखून हा रेतीचा अवैध व्यवहार सुरु आहे याचे प्रत्येय मना कोळी यांचे रेती भरत असलेल्या ट्रॅक्टरचे चित्रीकरण करतांना त्यांचे बोलण्यातून समजले..रावेर महसूल अधिकारी यांचे सोबतच बोलून काही उपयोग होणार नाही हे आमचे लक्षात येता आम्ही जिल्हाधिकारी यांना फोन केला असता मना कोळी याने सामरी पावर दाखवत इंडिया स्टार वन न्यूज चे संपादक संदीप सुरवाडे यांचे ताब्यातील मोटर सायकल वाहनाची चाबी काढून घेत आणी मोबाईल हिसकावून घेत बाचा बाची करत ट्रॅक्टर चालकाला सांगून ट्रॅक्टर पळवले.. रावेर तालुक्यात रेती तसकारांचे वाढलेले हे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन एखाद्या मोठया गुन्ह्याला तर आमंत्रण देत नाही आहे याचा विचार रेती माफियानं कडून पैसा घेऊन त्यांना अदृश्य अभय देणाऱ्या महसूल विभागाने करावे वेळीच वाळू रेती तस्करांच्या मुसक्या न आवळल्यास आणी एखाद्या वेळेस काही अपरिहार्य घटना घडल्यास होणाऱ्या परिणामांना एकमेव सर्वस्वी जबाबदार रावेर व जळगांव महसूल विभाग राहील याची जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.