Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी उन्हाळ्यात पाणीटंचाई न व्हावी यासाठी घेतली पाठबंधारे विभाग अधिकाऱ्यांची भेट

                                 


( प्रतिनिधी )जळगाव आज जळगांव येथे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. समाधान महाजन सर यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, उप कार्यकारी अभियंता सो. श्री.तु.सु.महाजन  यांची भेट घेऊन चर्चा केली . तापी नदी शेजारी असुनहि हतनुर धरणाच्या खालील भागात तापी नदीच्या पात्रात पाणी पातळी कमी होऊन वरणंगाव शहरासह ग्रामीण भागात नेहमी साठी पाणी टंचाई निर्माण होण्याचे कारणांबाबत  माहिती घेतली . धरणातून सुटणारे पाण्याचे आर्वतन  आणि नदीपात्रातील पाणी उचल यातील तफावत पाहता वरणगावसह फुलगांव अंजनसोंडे कठोरे वगैरे ग्रामीण भागातील पाणी टंचाईस पाटबंधारे विभागच जबाबदार असल्याचे अधिकाऱ्यांना बजावले . येत्या  काळात धरणातील पाण्याचे आरक्षण , आर्वतन वेळी पाण्याचा विसर्ग आणि नदीपात्रातील पाणी उचल याचा हिशोब करून धरणातून पाणी  आर्वतन सोडण्याबाबत नियोजन करावे जेणे करून वरणंगाव शहरासाठी व ग्रामीण परिसरातील गावांना लागणारे पाणी पुरवठा येत्या उन्हाळ्यात कमी पडणार नाही  अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशा सुचना दिल्यात . 

सुचना लक्षात घेता म.उप कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की नियत वेळापत्रकानुसार ( ४५ दिवसाचे आर्वतन ) आजच आर्वतन सोडले असुन पुढील काळात नदी पात्रातील पाणी पातळी कमी होऊन वरणंगाव शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होणार नाही  असे नियोजन करण्याचे आश्वासन दिले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.