जळगाव दि.23 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात 20 हजार मॅट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध आहे. मात्र तरीही काही भागात युरियाचा तुटवडा जाणवत आहे तेव्हा जिल्ह्यात युरियाचे पूर्ण वितरण करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत युरियाच्या खतांच्या तुटवळ्या बाबत आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या माहितीत तफावत दिसून आली
