*गाव तिथे शाखा व घर तिथे वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता तयार करा- जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे*
भुसावळ - वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका बैठक दिनांक 24/09/2023रोजी सकाळी 11:00 वा. साईननगर वरणगांव येथे मनोज वानखेडे यांचा निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे , यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसवाळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावसकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली .
बैठकीत गांव तिथं शाखा व घर तिथे कार्यकर्ता निर्माण करणे, वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते सभासद नोदणी करणे,सर्कल गट, गण व बूथ बांधणी यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .
यावेळी वंचित बहुजन आघाडी वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसेच वंचित बहुजन आघाडीची जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे आगामी निवडणुका तोंडावर आल्या असून निष्क्रिय पदाधिकारी यांनी सक्रिय होणे गरजेचे आहे अन्यथा पदमुक्त करण्यात येईल गाव तिथे शाखा व घर तिथे वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता तयार करा असे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी मागदर्शन केले
तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर यांनी तालुका पदाधिकारी यांना ग्रामीण भागात शाखा बांधणी बूथ बांधणी करण्या बाबत व जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आव्हान केले .
याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे ,भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,भुसावळ तालुका सल्लागार अॅड. प्रमोद तायडे, प्रशांत तायडे, यांनी मार्गदर्शन केले यावेळी भुसावळ कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रमेश खंडारे,भुसावळ तालुका उपाध्यक्ष गौतम लोखंडे, सचिन वानखडे,भुसावळ तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव, मनोज वानखेडे, भुसावळ तालुका सचिव जितेंद्र सुरवाडे , भुसावळ तालुका उपाध्यक्ष सलीम शेख, भुसावळ तालुका उपाध्यक्ष संदीप सुरवाडे, भुसावळ तालुका सचिव योगेश सावळे,भुसावळ तालुका सदस्य रतन इंगळे,भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे, आकाश तायडे वरणगाव,सुरज वाकोडे,कामगार आघाडी तालुका महासचिव तुषार पांडव,विश्वनाथ जोहरी पिंपळगाव खुर्द आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भुसावळ तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन सचिन वानखेडे यांनी मानले.
