( प्रतिनिधी बोदवड )दि.24जळगाव जिल्ह्यात बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे माणुसकीचे दर्शन घडले. विजेच्या धक्क्याने ( हनुमंतरायाचे दूत )वानराचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळलेल्या गावकऱ्यांनी वानराची विधीवत अंत्ययात्रा काढली.
बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ही घटना आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची प्रचंड चर्चा होत आहे. मात्र ग्रामस्थांनी दुर्दैवी आणि वेदनादायक मृत्यू झालेल्या माकडाला अंत्ययात्रा काढून योग्य तो सन्मान दिल्याची भावना व्यक्त केली.
