Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पीएच. डी. सी. ई. टी परीक्षेत गैरकारभार. वंचित युवा आघाडीने विचारला जाब

                             


     पुणे ( प्रतिनिधी )*पीएच.डी, सी. ई. टी परीक्षेत गैरकारभार; वंचित युवा आघाडीने विचारला जाब !*



पुणे, ता. १०: बार्टी, for महाज्योती आणि सारथी यांची संशोधक विद्यार्थ्यांसाठीची संयुक्त परीक्षा *काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वडगाव बुद्रुक सिंहगड कॉलेज* या ठिकाणी घेण्यात आली होती. परंतु मागे आळंदी येथे झालेल्या  परीक्षेत जसा गैरप्रकार झाला होता तसाच पेपर फुटीचा गैरप्रकार पीएच. डी संयुक्त परीक्षेत झाला आहे. या घटनेची दखल घेत *वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी* तातडीने घटनास्थळी जाऊन मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करत संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.


विद्यार्थ्यांनी पेपर सील आहे का, असे पाहिले तर कोणताही पेपर आजपर्यंत विद्यार्थ्यांना सीलबंद मिळाला नाही. A आणि B हा सेट विद्यापीठाकडून सील करून आला होता. मात्र, C आणि D सेट पूर्णतः त्याची झेरॉक्स कॉपी स्वरूपात होता. 


पुणे विद्यापीठाच्या पेपर सील नसेल तर देऊ नका अशा सूचना असतात. याबाबत वंचित बहुजन युवा आघाडीने विचारणा केली असता विद्यापीठाने कोणतेही उत्तर न दिल्याचे युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.


या घटनेची कोणतीही जबाबदारी बार्टी, महाज्योती, सारथी आणि विद्यापीठ प्रशासन घ्यायला तयार नाही. शासनाचा पूर्णतः सावळा कारभार चालला आहे. यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.


या घटनेला जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आली.

पार्टी कार्यालयामध्ये पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी ठिया केलेला असून त्यातील दोन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारिणीने  पेपर फुटी संदर्भात संबंधित सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर , कायदेशीर कारवाई करावी म्हणून गुन्हा दाखल करण्याकरिता  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गाठला आहे 


यावेळी, *वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील एड.अफरोज मुल्ला, पुणे शहराध्यक्ष सोमनाथ पानगावे, युवा महासचिव शुभम ज्ञानेश्वर चव्हाण ,कायदे सल्लागार एड. शिरीष पाटील, संघटक रोहन वाघचौरे, सचिव मंगेश कदम, सचिव अक्षय तायडे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष सागर ढेंबरे , उपाध्यक्ष अजित वाघमारे उद्देश गोरे, विपुल सोनवणे, गौतम तायडे, नवनीत अहिरे वंचित बहुजन माथाडीचे अध्यक्ष विशाल कसबे ,चंद्रकांत कांबळे तसेच संशोधक विद्यार्थी पाटोळे व केदारनाथ बडोदे अनेक विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.