वरणगाव तिरंगा सर्कल येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन
दि. २६/०१/२०२४ रोजी वरणगाव च्या तिरंगा सर्कल येथे संविधानाच्या मूल्यांचे जनजागृति करण्यासाठी संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तत्पूर्वी वरणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल जोहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. पंकज जोहरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुणाल इंगळे, नरेंद्र इंगळे, सिद्धांत इंगळे, विजयानंद सुरवाडे, भीमराव निकम,मयूर वानखेडे,ज्ञानेश्वर जोहरे,अशोक इंगळे, अल्केश जोहरे, मकुंदा धरंधरे, आकाश तायडे, बाळू बोडदे, अनिकेत निकम, वैभव पालवे,कल्पेश जोहरे,कुणाल सोनवणे, रेवत सपकाळे, गौरव इंगळे, प्रबोध सुरवाडे, नंदू कांबळे,हर्षल बागुल,आकाश बोदडे,अजय मेढे,पप्पू मगरे,संघर्ष इंगळे, आणि इतर कार्यकर्त्यांनी यांनी परिश्रम घेतले त्याच प्रमाणे परिसरातील नागरिक प्रा. अजित कलवले, डॉ. नितीन इंगळे, डॉ अशोक चित्ते, डॉ सुरेश बच्छाव आणि शहरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
