वंचित बहुजन महिला आघाडी यावल तालुका बैठक मोठ्या उत्साहात संपन्न
यावल - वंचित बहुजन महिला आघाडी यावल तालुका बैठक दिनांक 25/1/2024 रोज गुरुवार रोजी सकाळी 11:00वा. कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,जिल्हा महासचिव वंदनाताई इराक यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन महिला आघाडी यावल तालुकाध्यक्षा प्रतिभाताई कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी बैठकीत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे यांनी महिला आघाडी वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे आवाहन केले बैठक यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, संतोष तायडे (किनगांव), सुवर्णा मेघे, रूपाली बाऱ्हे, पुजा तायडे, संगीता मेघे,लताबाई बाविस्कर, मंगला कोळी, संध्या भालेराव, सुशीला भालेराव, भारती अडकमोल, लाटाबाई शामराव तायडे, जनाबाई डांबरे, शर्मिला ठाकरे, फरिदा खाटिक, हसिना तडवी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले
