जुगार अड्ड्यावर छापा
वरणगाव पोलिसांनी केली कार्यवाही.
भुसावळ (प्रतिनिधी )दि.8पिंपळगाव बु. तालुका भुसावळ येथे जुगार खेळताना नऊ आरोपींना वरणगाव पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले
सविस्तर माहिती अशी की दि.७/४/२०२४रोजी दुपारी २.४० वाजता च्या सुमारास पिंपळगाव बुद्रुक येथे बौद्ध वाड्यात एका घराच्या आडोशाला जुगार खेळत असताना वरणगाव पोलिसांनी खालील नऊ आरोपींना अटक केली आरोपी नं १) सुपडू नीना बावस्कर वय ४१. आरोपी नं २) समाधान वेडू चव्हाण वय .४५. आरोपी नं ३ ) प्रकाश हरी बावस्कर वय ४० आरोपी नं.४) गोकुळ माणिक पाटील वय ४५ आरोपी नं.५) विनोद वेडू चव्हाण वय.४५ आरोपी नं.६) शुभम सुनील तळेले वय .३२ आरोपी नं ७) संजय अर्जुन बेंडाळे वय ४५. आरोपी नं.८) ज्ञानदेव धनसिंग मावळे वय.६० सर्व राहणार पिंपळगाव बुद्रुक तालुका भुसावळ आरोपी क्र ९) सुरेश गणपत सुरवाडे वय ३०. राहणार जुनोने तालुका बोदवड या सर्व आरोपींना अटक करून वरणगाव पोलीस स्टेशन भाग ६सीसीटीएन एस नं.८४/२०२४ मुंबई जुगार कायदा कलम १२a प्रमाणे फिर्यादी पो का /२४१ प्रशांत विनायक ठाकूर नेमणूक वरणगाव पोलीस स्टेशन यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल केला
सदर गुन्ह्याचा तपास पो.हे का. प्रमोद कंखरे करीत आहे
