पतिनिधी ( भुसावळ)दि.14*भुसावळ तालुक्यातील आचेगांव येथे भारतीय राज्यघटनेने शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी**
सविस्तर वृत्त:तालुक्यातील आचेगांव येथे सालाबादप्रमाणे यंदाही आज दि.14 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात तसेच भिम नगर येथे साजरी करण्यात आली,ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ मनिषा झांबरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले,
उपस्थित ग्रामसेवक महेंद्र तायडे,उपसरपंच दिपक पाटील,सदस्य नरेंद्र पाटील, कल्पना चौधरी,अक्षय बेंडाळे, मनोहर फेगडे,आकाश झांबरे,आशिष चौधरी, इंडिया स्टार न्युज चे संपादक संदीप सुरवाडे. पत्रकार प्रकाश सुरवाडे,पत्रकार जयराज पवार,शिपाई कर्मचारी अरूण चौधरी तसेच
भिमनगर येथे गावातील पोलीस पाटील वासुदेव पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील झेंडा वंदन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले तसेच भिमनगर मधील चिमुकली दामिनी संदिप सुरवाडे हिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छान असे विचार मान्यवरांनसमोर व्यक्त केले, तसेच अश्विनी गोकुळ सुरवाडे या मुलीने सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची विचारांची तिच्या भाषणातून सर्वांसमोर मांडले,तसेच जयंती समिती सचिव प्रतिक्षा समाधान सुरवाडे या मुलीने देखील तिच्या पहिल्या भाषणातुन एकदा माता सावित्रीबाई फुले यांनी जो महिलांना उपदेश दिला त्याचप्रमाणे महिलासंक्षम व्हावी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी तसेच सर्व समाजघटकांनासाठी केलेले कार्यांचे विचार मान्यवरांनसमोर व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप केले.
गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येत जयंती साजरी केली..
यांनी घेतले परिश्रम
जयंती समिती अध्यक्ष संजना सुरवाडे
उपाध्यक्ष अश्विनी वानखेडे
सचिव प्रतिक्षा सुरवाडे
व भिम सैनिक
सुत्र संचालन पत्रकार संदिप सुरवाडे यांनी केले व आभार सतिश सुरवाडे यांनी व्यक्त केले
