जळगाव प्रतिनिधी
दिनांक 28-03-2025 सकाळी 11 वाजता पासून प्रजाशक्ती क्रांती दलाचे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आरटीओ चेक पोस्ट कर्की नाका येथे बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा.अशोराज तायडे साहेब यांच्या आदेशाने तसेच राज्य अध्यक्ष प्रा. पंकज सपकाळे साहेब राज्य सचिव ॲड. सतीश आर. मोरे राज्य प्रवक्ता सत्यवान रामोशी राज्य महिला अध्यक्षा वैशालीताई गव्हाळे राज्य महिला सचिव जोतिबाचा सुरवाडे ताई तसेच जिल्हा अध्यक्ष राहुल मराठे युवा जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी तसेच इतर जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सदर उपोषण केले जात आहे. सदर उपोषण कर्त्ये यांच्या शासनाकडे तीन मागण्या आहेत 1) वाहन चालकांकडून होत असलेली बेकायदेशीर वसुली पूर्णपणे बंद करण्यात यावी. 2) दिनांक 31-01-2023 पासून ते दिनांक 24- 03-2025 पर्यंत सदर कर्की ता.मुक्ताईनगर चेक पोस्ट वर कर्त्यव्यास असलेले अधिकारी, कर्मचारी व संबधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून त्वरित बडतर्फ करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणे बाबत.3) सदर कर्की चेक पोस्ट कायम स्वरुपी बंद करणे बाबत. अशा प्रकारच्या मागण्या प्रजाशक्ती क्रांती दल या संघटने कडून करण्यात येत आहेत.
